

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना भोजनानंतर पंधरा मिनिटांनी उलट्या, जुलाब यांचा त्रास होऊ लागल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थ्यांची तिघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शहादा शहरातील समाज कल्याण विभागातील वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना मळमळणे आणि उलट्या-जुलाब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहादा शहरातील समाज कल्याण वस्तीगृहात ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणे दुपारी डाळ भात, शेवगा, चपाती खाल्ल्यानंतर त्यांना पंधरा मिनिटांनी विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागला.या विद्यार्थ्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी तिघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अन्न विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले, मात्र काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.तहसीलदार संभाजी पाटील ,प्रांत अधिकारी दीपक गिरासे, शहादा पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहे. या वसतीगृहात ठेकेदार निष्कृष्ट अन्न देत असल्यामुळे या अगोदरही तक्रार केल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. वसतीगृहातील वॉर्डन आणि शिक्षक रुग्णालयात न आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

