प्रवाशांनी भरलेल्या भरधाव बसचा भीषण अपघात; वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने घात झाला, 7 जणांचा जागीच मृत्यू

प्रवाशांनी भरलेल्या भरधाव बसचा भीषण अपघात; वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने घात झाला, 7 जणांचा जागीच मृत्यू

हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील तीसा-बैरागढ मार्गावर आज शनिवारी सकाळी भीषण घटना घडली आहे. या मार्गावरील चालुज वळणावर भरधाव बस उलटल्यानंतर दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या बसमधील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. या बसमध्ये एकूण 15 ते 20 प्रवासी होते. जखमींना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बैरागगढहून चंबाच्या दिशेना जाणाऱ्या भरधाव बसचा हा भीषण अपघात झाला आहे.

तीसा-बैरागढ महामार्गावरून सात जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 11 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातात बसचा चालक आणि क्लिनरचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताविषयी अद्याप कोणतीही सविस्तर माहिती हाती आलेली नाही. अपघात झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. स्थानिक लोकांनी तातडीने जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली.

वळणावर अपघात झाल्याची माहिती मिळताच काही वेळात पोलीस आणि प्रशासनाचं बचाव पथक देखील घटनास्थळी पोहोचलं. अपघात नेमका कसा झाला, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस अधिकारी अनुभव शर्मा यांनी या अपघात आणि मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *