

जर तुम्ही दरमहा गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जाचा ईएमआय भरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. मध्य पूर्वेतील जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मध्यवर्ती बँकेने सलग पाचव्यांदा रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आर्थिक वर्ष 2027 च्या तिसऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यानंतर आपल्या भाषणात सांगितले की, रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम राहील.
The Monetary Policy Committee has decided to keep the policy repo rate unchanged at 5.25%, and to maintain a neutral stance, announces RBI Governor Sanjay Malhotra. pic.twitter.com/zNGQNAQR7r
— ANI (@ANI) August 5, 2026

