
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश आलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली आहे. परीक्षेतील गोंधळ, अनियमितता आणि पारदर्शकतेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींसह संबंधित एजन्सीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या 24 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

