उज्जवल निकम केंद्रीय मंत्रिमंडळात? अमित शहांच्या भेटीने चर्चांना उधाण, दिल्लीत मोठ्या घडामोडी

उज्जवल निकम केंद्रीय मंत्रिमंडळात? अमित शहांच्या भेटीने चर्चांना उधाण, दिल्लीत मोठ्या घडामोडी

राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता भाजपचे राज्यसभा खासदार उज्जवल निकम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उज्ज्वल निकम अमित शहांच्या भेटीला

उज्जवल निकम यांनी आज अमित शाह यांची भेट घेतली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना या भेटीला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांना आता केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्ताराआधी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

निकम यांच्याबाबत मुंबईतून चांगला अहवाल

सूत्रांच्या माहितीनुसार, उज्जवल निकम आणि अमित शाह यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. ज्येष्ठ वकील असलेले निकम हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्याबाबत मुंबईहूनही चांगला अहवाल दिल्लीला पोहोचला आहे. त्यामुळे त्यांचे प्रमोशन होऊन त्यांच्यावर महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता देशाचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

कोण आहेत उज्ज्वल निकम?

उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील आहेत. हत्या, दहशतवाद आणि इतर गाजलेल्या फौजदारी खटल्यांमध्ये त्यांनी सरकारची बाजू मांडली आहे. 2025 मध्ये त्यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झाली. त्यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. आता त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *