
आचार्य चाणक्य यांनी काही मोलाचे आणि महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. यापैकी पहिला संदेश हा गुपित राखण्याबद्दल आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करू नका. तुमची कमजोरी आणि गुपिते शक्य तितकी स्वतःपुरती ठेवा. विश्वास ठेवताना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा. चुकीच्या व्यक्तीला सांगितलेले गुपित भविष्यात तुमच्याविरुद्ध वापरले जाऊ शकते, असा मोलाचा सल्ला चाणक्य देतात.
आचार्य चाणक्य यांनी संगत, मैत्री आणि त्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम याविषयीही मोलाचा संदेश दिलेला आहे. माणसाच्या विचारांवर त्याच्या संगतीचा मोठा प्रभाव पडतो. चांगली संगत तुमच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देते. चुकीची संगत तुमच्या सवयी आणि विचार दोन्ही बदलू शकते. त्यामुळे मित्र आणि सहकारी निवडताना सावध राहा, असा मोलाचा सल्ला चाणक्य यांनी तरुणांना दिलेला आहे.
गेलेली वेळ कोणत्याही परिस्थितीत परत मिळवता येत नाही, असे चाणक्य सांगतात. आजची महत्त्वाची कामे उद्यावर ढकलू नका. योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. संधी मिळाल्यावर तिचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्या. वेळेची किंमत ओळखणारा माणूस आयुष्यात इतरांपेक्षा पुढे जाऊ शकतो, असा संदेश आचार्य चाणक्य यांनी दिलेला आहे.
चाणक्य नीतिमध्ये संकट काळात काय करावे याबाबतही मोलाचा संदेश देण्यात आलेला आहे. संकटाच्या काळात घाबरण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीचा विचार करा. कठीण प्रसंगातच माणसाची खरी ताकद आणि बुद्धिमत्ता दिसून येते. वाईट काळ कायमचा राहत नाही, पण त्यातून मिळालेला अनुभव महत्त्वाचा असतो. म्हणूनच संकटात घेतलेला संयमी निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. धैर्य, बुद्धी आणि संयम यांच्या जोरावर मोठ्या अडचणींवर मात करता येते, असे चाकण्य सांगतात.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.






