चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता

चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता  थेट उद्योगमंत्री मैदानात, उदय सामंत घेणार बैठक

मोठी बातमी समोर येत आहे, आता चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी थेट मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. ते या संदर्भात एक बैठक घेणार आहेत. येत्या 16 ऑगस्टला उद्योगमंत्री उदय सामंत प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत. चाकणमधील रस्त्यांच्या दुरवस्थेवर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हालचालींना वेग आला असून, आता उदय सामंत हे येत्या 16 ऑगस्ट रोजी बैठक घेणार आहेत. औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उदय सामंत यांची फोनवरून चर्चा झाली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर चाकणमध्ये उद्योजकांना भेडसवणाऱ्या समस्यांवर तोडगा निघण्याची शक्ता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *