ब्लाऊज घालायला लावला नसता तर…, सीतेच्या कॉस्च्युम ट्रोलिंगवर ‘रामायण’मधील अभिनेत्री म्हणते, ‘सर्वांना खूश नाही ठेऊ शकत’

ब्लाऊज घालायला लावला नसता तर…, सीतेच्या कॉस्च्युम ट्रोलिंगवर ‘रामायण’मधील अभिनेत्री म्हणते, ‘सर्वांना खूश नाही ठेऊ शकत’

अभिनेता रणबीर कपूर, सनी देओल आणि यश स्टारर ‘रामायण’ सिनेमाचा पहिला पार्ट यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, पण सोशल मीडियावर ट्रोलिंगची देखील सुरुवात झाली आहे. आता सिनेमातील कलाकारांच्या कॉस्च्युमवरुन वाद टोकाला पोहोचले आहेत. सिनेमातील सीता (साई पल्लवी) आणि कैकेयी (लारा दत्ता) यांच्या कपड्यांवरुन वाद सुरु आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रींच्या कपड्यांवरुन वाद सुरु असताना अभिनेत्री सुरभी दास हिने स्पष्ट उत्तर दिलं आहे.. सुरभी म्हणाली, ‘सर्वांना खूश केलं जाऊ शकत नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली आहे.

का होत आहे सिनेमावर ट्रोलिंग?

सांगायचं झालं तर, सिनेमात साई पल्लवी आणि लारा दत्ता यांना ज्या प्रकारचे ब्लाऊज घालायला दिले आहे, त्यामुळे वाद निर्माण होत आहेत. अनेकांनी अभिनेत्रींच्या लूकचा मॉर्डन लूक म्हणून उल्लेख केला आहे. अनेकांचं असं म्हणण आहे, कॉस्च्युम ज्या प्रकारचे दाखवण्यात आले आहेत, ते पाहून वाटत नाही की निर्माते त्रेता युगातील कथा मोठ्या पडद्यावर दाखवत आहेत.

ट्रोलिंगवर सुरभी दास म्हणाली, ‘मला असं वाटतं लोकं कायम काही तरी बोलतच राहणार.. जर आम्ही सीतेच्या भूमिकाला ब्लाऊज घातला नसता तरी, लोकांचं म्हणणं असतं, ब्लाऊज का घातला नाही. ब्लाऊज घातला तरी अडचण आहे… लोकं कायम काही तरी कमतरता काढतच राहतील… रामायण एक फार मोठा प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही अशी अपेक्षा ठेवू शकत नाही की, सर्वकाही तुमच्या सहमतीने होईल. मी असं देखील म्हणणार नाही की, सर्वकाही परफेक्ट असेल… पण सिनेमाची प्रतिक्षा करा… सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कळेल की, निर्मात्यांनी काय बनवलं आहे.’

पुढे सुरभी म्हणाली, ‘सिनेमा फार मोठ्या स्केलवर तयार झाला आहे, त्यामुळे या सर्व गोष्टींकडे प्रेक्षकांचं लक्ष जाणार नाही… याआधी देखील रामायणावर आधारित अनेक सिनेमे आले आहेत आणि त्यावर देखील कोणते तरी वाद झालेच असतील. आपण सर्वांना खूश ठेऊ शकतन नाही. आता यामध्ये ब्लाऊज घातला तरी समस्या आणि नाही घातला तरी समस्या आहे.’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *