लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या ‘त्या’ कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला…

दिल्ली येथे खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचा रिसेप्शन सोहळा पार पडला. या रिसेप्शनला मोठे राजकीय नेते उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य बडे नेते उपस्थित होते. याच शिवाय कुटुंबातील अनेक जण देखील उपस्थित होते. या रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले.

यावेळी सुप्रिया सुळेंच्या एका कृतीची तुफान चर्चा होत आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. सुप्रिया सुळेंनी रोहित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून दिली. झालं असं की, रिसेप्शन वेळी पंतप्रधान आले आणि त्यांच्या जवळच रोहित पवार उभे होते. इतक्यात सुप्रिया सुळे आल्या आणि रोहित पवारांचा हात धरत थेट त्यांना पंतप्रधानांच्या समोर आणले आणि त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये गप्पा झाल्या. या प्रसंगाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

आणखी एक विशेष बाब म्हणजे ज्यावेळी राहुल गांधी या रिसेप्शनमध्ये होते, त्याचवेळी अमित शाह देखील पोहोचले. अमित शाह रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर पोहोचले, त्यावेळी राहुल गांधी तिथेच खाली होते. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी, दिगज्जांनी या रिसेप्शनला हजेरी लावली. सुप्रिया सुळे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना फोटोंमध्ये दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *