पुणे होतंय गुन्ह्यांचं माहेर घर… PG मध्ये राहणाऱ्या तरुणाची हत्या, तर तरुणी गंभीर जखमी, CCTV फुटेजने फोडला मोठ्या प्रकरणाचा भांडा

पुणे होतंय गुन्ह्यांचं माहेर घर… PG मध्ये राहणाऱ्या तरुणाची हत्या, तर तरुणी गंभीर जखमी, CCTV फुटेजने फोडला मोठ्या प्रकरणाचा भांडा

विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख होती, पण आता वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता पणे गुन्ह्यांचं माहेर घर होतंय का? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. पुण्यात अनेक महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या, आता भरदिवसा PG मध्ये राहत असलेल्या तरुणाची हत्या झाली असून तरुणी गंभीर जखमी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. PG मध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे घडलेली घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून, प्रेमाच्या त्रिकुटामुळे मोठी घटना घडल्याचं तपासात समोर आलं आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संबंधित घटना पुणे येथील हिंजवडी भागात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हिंजवडी स्थित सात मजल्यांच्या PG मध्ये गेल्या चार महिन्यांपासून सागर गायकवाड मॅनेजर म्हणून काम करत होता… बुधवारी रात्री एक तरुणी एका महिन्यासाठी त्याच PG मध्ये राहण्यासाठी आलेली. तरुणीने PG संचालकाला सांगितलं की, ‘सागर माझा बॉयफ्रेंड आहे…’, त्यामुळे तिच्या राहण्याची व्यवस्था तिसऱ्या मजल्यावर करण्यात आली. PG मधील 310 नंबरच्या खोलीत तरुणीला राहण्यासाठी जागा मिळाली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनेश महादेव झांबरे नावाचा तरुण PG मध्ये आला. दिनेश याने सांगितलं, सागर याला भेटायचं आहे… आणि तिची प्रेमिका देखील येथेच राहते, PG मधील कर्मचाऱ्याने सांगितलं की, सागर तिसऱ्या मजल्यावर राहत आहे. त्यानंतर दिनेश स्वतः तिसऱ्या मजल्यावर पोहोचला. तो पोहोचल्यानंतर, काही वेळातच ओरडण्याचा आवाज येऊ लागला… जेव्हा घटनास्थळी लोकांची गर्दी जमली, तोपर्यंत उशीर झालेला. सागर जमिनीनर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेलाय. दिनेश याने सागर याच्यावर लोखंडी रॉडने वार केले. कथित आरोपीने तरुणीवर देखील जीवघेणा हल्ला केला.

सुरुवातीच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि तरुणी शाळेत असल्यापासून एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यानंतर दोघे बीसीएचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर तरुणी आणि सागर यांच्यातील संबंध रिलेशनशिपपर्यंत पोहोचले… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच कारणामुळे कथित आरोपीने असं कृत्य केलं.

घडलेल्या घटनेत सागर याची हत्या झाली असून तरुणी गंभीर जखमी आहे. तिच्यावर उपचार सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे घटनेचं रहस्य समोर आलं. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने सागरवर लोखंडी सळईने 13 ते 14 वेळा सपासप वार केले. पोलीस त्या फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. पोलिसांनी दिनेश महादेव झांबरे या आरोपीला अटक केल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *