Abhijeet Dipke: राजकीय पक्षांच्या आंदोलनावर लाठीचार्ज होत नाही; अभिजीत दीपकेंची रांची आंदोलनावर संतप्त प्रतिक्रिया

Abhijeet Dipke: राजकीय पक्षांच्या आंदोलनावर लाठीचार्ज होत नाही; अभिजीत दीपकेंची रांची आंदोलनावर संतप्त प्रतिक्रिया

झारखंडमध्ये भरती परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्यावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. रांचीमध्ये हजारो विद्यार्थी एकवटले असून जोरदार आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने कूच केली. विधानसभेपर्यंत जाण्याच्या मार्गात एकूण सहा बॅरिकेड्स होते. हे सहाही बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी पार केले. विद्यार्थी विधानसभेच्या अगदी जवळ आल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला आहे. त्यानंतर लाठीचार्ज केला, टीअर गॅस सोडण्याल आला. आता यावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अभिजीत दिपके?

नुकताच अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रांची येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, काल झारखंडमध्ये जे काही ते फार वाईट होते. 20 तारखेला जंतर मंतरमध्ये दृश्य होतं तसेच दृश्य झारखंडमध्ये पाहायला मिळाले. तेथे विद्यार्थांवर टीअर गॅस सोडण्यात आला, लाठीचार्ज करण्यात आला. मला हे कळतच नाहीये की जेव्हा एखादा राजकीय पक्ष आंदोलन करतो तेव्हा लाठीचार्ज किंवा टीअर गॅसचा वापर का केला जात नाही? हा टीअर गॅस आणि लाठीचार्ज नेहमी फक्त विद्यार्थ्यांवर का केला जात आहे?

पुढे अभिजीत दीपके म्हणाले, या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र महतोजी यांच्याशी माझे बोलणे झाले. ते गेल्या ९ दिवसांपासून उषोण करत आहेत. त्यानंतरही पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यांना मारण्यात आले आहे. ते सध्या रुग्णालयामध्ये आहेत. त्यांची प्रकृती आता चिंताजनक आहे. त्यामुळे कुठे तरी जाऊन सर्व सरकारला विचार करायला हवा की जंतर मंतर असो किंवा झारखंड असो विद्यार्थ्यांवर असे अत्याचार करुन काय मिळत आहे? हे विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. भविष्यासाठी लढत आहे कोणत्याही वोट बँकसाठी लढत नाहीत. त्यांच्यावर अशा प्रकारे लाठीचार्ज झाला नाही पाहिजे. त्यांना अशी क्रूरुपणाची वागूण मिळू नये.

विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?

सरकार आणि विद्यार्थ्यांमधील मुख्य मुद्दा सीजीएल परीक्षेच्या अनुषंगाने आहे. या मुद्द्यावरच घोडं आडलं आहे. विद्यार्थ्यांनी सीजीएल परीक्षा रद्द करून या कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पण सरकार त्यावर सहमत नाहीये. एका निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असं सरकारचं म्हणणं आहे. तसेच आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आल्यावर ईडी मार्फत चौकशी केली जाईल, असं सरकारने म्हटलं आहे. पण या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याच्या मागणीवर विद्यार्थी अडून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *