
तुकाराम मुंढे हे एक धडाडीचे आयएएस अधिकारी आहे. सध्या ते महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असून त्यांच्या कारवायांची संपूर्ण देशात चर्चा आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ते थेट कारवाई करत आहेत.
तुकाराम मुंढे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून देशभरात परिचित आहेत. अशा पद्धतीने काम करणारा अधिकारी आमच्याकडे असायला हवा होता, अशी भावना इतर राज्यातील जनतेकडून व्यक्त केली जातेय.
तुकाराम मुंढे आज आयएएस अधिकारी असले तरीही त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत आपल्या लग्नाबाबत दिलखुलासणे सांगितले आहे.
तुकाराम मुंढे यांनी लव्ह मॅरेज केलं की त्यांचं लग्न हे अरेंज मॅरेज आहे, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याचेही उत्तर खुद्द तुकाराम मुंढे यांनीच दिले आहे. आपल्या लग्नाचा किस्सा सांगता त्यांनी हे उत्तर दिलंय.
तुकाराम मुंढे यांनी अरेंज मॅरेज केलेले आहे. आमचे पहिल्या नजरेत प्रेम असे काही नव्हते; आम्ही संवाद साधत गेलो, आमचे विचार जुळत गेले. आमच्यात प्रेम वाढत गेले, असं मोकळेपाणे सांगितले आहे.






