DPL 2026: 9 षटकार आणि 6 चौकार..! शतकी खेळीसह विजयासाठी दिलेलं 147 धावा 14 षटकात पूर्ण

DPL 2026: 9 षटकार आणि 6 चौकार..! शतकी खेळीसह विजयासाठी दिलेलं 147 धावा 14 षटकात पूर्ण

दिल्ली प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत सेंट्रल डेल्ही किंग्स आणि पुरानी दिल्ली 6 हे संघ आमनेसामने आले होते. बुधवारी या दोन संघात सामना पार पडला. या सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावल्याने 15-15 षटकांचा खेळ केला गेला. पुरानी दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकात 140 दावा केल्या आणि विजयासाठी 141 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान षटकं कमी केल्याने मोठं होतं. पण सेंट्रल डेल्ही किंग्सकडून खेळणाऱ्या 23 वर्षीय यश ढुलचं वादळ घोंघावलं. त्याने वादळी खेळी करत प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करून सोडलं. यश ढुल इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरला होता. त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. कारण दिलेलं लक्ष्य 15 षटकांच्या आत पूर्ण करायचं होतं. त्याने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला. या दरम्यान त्याने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर एकाच षटाकत तीन षटकात तीन षटकार मारत आक्रमक बाणा दाखवून दिला.

पुढच्या 25 चेंडूत यश ढुलने आणखी आक्रमक बाणा दाखवला आणि आणखी 50 धावा जोडल्या. त्याने 47 चेंडूत शतक साजरं केलं. 14 व्या षटकात सेंट्रल डेल्ही किंग्सला विजयासाठी तीन धावांची गरज होती. तर यश ढुल 45 चेंडूत 97 धावांवर खेळत होता. स्ट्राईक मिळाल्याने पहिल्या चेंडूवर त्याने दोन धावा घेतल्या आणि 99 धावांवर पोहोचला. स्ट्राईकला असलेल्या यश ढुलने दुसऱ्या चेंडूवर विजयी धाव घेतली आणि शतकही साजरं केलं. यश ढुलने दिल्ली प्रीमियर लीगच्या इतिहासात आतापर्यंत तीन शतके झळकावली आहेत.

2024 मध्ये यश ढुलच्या हृदयावर एक शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेच्या मोठ्या संकटातून सावरून त्याने 2025 आणि 2026 च्या पर्वात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात 45 चेंडूत 72 धावा, दुसऱ्या सामन्यात 13 चेंडूत 35 धावा, तर तिसऱ्या सामन्यात 5 चेंडूत 10 धावा करून बाद झाला होता.

आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये यश ढुलने एकूण 217 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 72 ची असून स्ट्राइक रेट 192 आहे. त्याने या स्पर्धेत 14 चौकार आणि 17 षटकार मारले आहेत. त्याच्या योगदानामुळे संघाने चारही सामने जिंकले आहेत. दरम्यान, दुलीप ट्रॉफी 2026-27 च्या हंगामासाठी देखील नॉर्थ झोन 15 सदस्यीय संघात त्याची निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *